Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! कोकणासह ठाणे, पुणे, सातारा व ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! कोकणासह ठाणे, पुणे, सातारा व ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! कोकणासह ठाणे, पुणे, सातारा व ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Jul 31, 2024 05:57 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज कोकणसह, ठाणे, पुणे, सातारा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! कोकणासह ठाणे, पुणे,  सातारा व  ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! कोकणासह ठाणे, पुणे, सातारा व ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज कोकणसह, ठाणे, पुणे, सातारा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाची संतत धार पुण्यात सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून गरजेनुसार पाणी सोडले जाणार आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. आज कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवस ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गला तर मुंबईला १ ऑगस्ट ते ३ ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये १ ते ३ ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, मध्य महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर व साताऱ्याला पुढील दोन दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये एक ते तीन ऑगस्ट च्या दरम्यान घाट विभागात तुरळक ठिकाणी अति ते अत्यंत जोरदार म्हणजे २४ तासात २०० मिलिमीटर किंवा त्याहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या मैदानी भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात दोन ते तीन ऑगस्टला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दोन ते तीन ऑगस्टला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात चंद्रपूर गडचिरोली गोंदियात दोन ऑगस्टला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुढील चार ते पाच दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात येलो अलर्ट दिला आहे.

पुण्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे व परिसरात पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाशा सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात आज व उद्या जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एक ते तीन ऑगस्ट दरम्यान घाट विभागात काही ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २४ तासात २०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक ते तीन ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर