Maharashtra Weather update : राज्यात थंडी, उन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यांमध्ये थोडीशी आर्द्रता येत आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाड्यात काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिम प्रकोप पासून एक कमी दाबाची रेषा रेखांश ७० डिग्री पूर्व आणि अक्षांश ३० डिग्री उत्तरच्या उत्तरेला आहे. वाऱ्याची एक चक्रीय स्थिती पूर्व विदर्भावर आहे. तिथून एक कमी दाबाची रेषा उत्तर कर्नाटक पर्यंत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यांमध्ये थोडीशी आर्द्रता येत आहे. पुढील ४८ तासात राज्याच्या संपूर्ण भागात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर उत्तरकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानात बऱ्यापैकी घट होण्याची शक्यता आहे.
पुढील ७२ तासात पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. ९ तारखेनंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वेळोवेळी अंशतः ढगाळ वातावरणामुळे थोडी घट होण्याची शक्यता आहे. ९ तारखेनंतर ४ ते ५ दिवस मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये ११ आणि १२ फेब्रुवारीला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील ४८ तासात किमान तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या ७२ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. ९ तारखेनंतर हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात जवळजवळ दोन ते तीन डिग्री सेल्सियस ने वाढवण्याची शक्यता आहे
दिल्ली, ऊतर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात थंड वाऱ्यांचा प्रभाव असून अजून काही दिवस या ठिकाणी गारठा कायम राहणार आहे. या सोबतच काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. राजधानी दिल्ली येथे देखील थंडी कायम असून यामुळे अनेक नागरिक प्रभावित झाले आहे. हिमालयावरुन येणारे थंड वाऱ्यामुळे या ठिकाणी थंडीत वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या