Maharashtra IMD Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडी गायब झाली आहे. तर तापमानात देखील वाढ झाली आहे. त्यात, ढगाळ हवामान असल्याने पिकांवर संकट ओढवलं आहे. संपूर्ण राज्यात आज ढगाळ हवामान राहणार असून काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात बहुतांश भागात थंडी जोर ओसरला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे एकीकडे राज्यात पहाटे गारवा जाणवत आहे. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात धुके देखील पडत आहे. तर किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब व पाकिस्तावर असून उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात ८ पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दक्षिणेकंदील काही राज्यात देखील पाऊस पडण्याची व वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदललेल्या हवामानाचा राज्याच्या हवामानावर देखील परिमाण होत आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात सध्या पहाटे गारठा पडत आहे. तर दुपारी तापमानात मोठी वाढ होत आहे. पुण्यात बुधवारी मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान होते. तर रात्री आणि सकाळी गारठा व धुके असे दोन्ही वातावरण पुणेकरांनी अनुभवले. त्यात काही ठिकाणी हलका पाऊस देखील झाला. पुणे, नाशिक, मुंबईचा पारा १६ ते १९ अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. तर मराठवाड्यात देखील तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पुढील काही तासांत हे तापमान वाढल्याची शक्यता आहे. विदर्भात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या