Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ पर्यंत स्थिर आहे. त्यामुळे आज उद्या कोकण व विदर्भात बहुतेक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात आज काही तर उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात आजपासून पुढील चार-पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड येथे पुढील तीन दिवस रत्नागिरी येथे पुढील दोन दिवस व सिंधुदुर्ग येथे आज काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तर सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात आज व उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज खानदेश येथील जळगाव येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व परिसरात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.