Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात गेले काही दिवस मोठा बदल होत आहे. कुठे थंडीत वाढ झाली आहे. तर कुठे अजूनही बोचरी थंडी पडत आहे. प्रामुख्याने विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ही थंडी पडत आहे. त्यात आता पावसाची भर पडली आहे. राज्यात पुढील टीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हवामान कोरडे राहून काही ठिकाणी तापमानात वाढ दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या सोबतच पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोव्यात संपूर्ण राज्यामध्ये आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर कोकण व गोव्यात ११ तारखेला तर मध्य महाराष्ट्रात १०, ११ व १२ तारखेला आणि मराठवाड्यामध्ये ११ व १२ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान दोन ते तीन डिग्री सेल्सिअसणे वाढवण्याची शक्यता आहे.
पुणे आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीत थंडीचा कडाका कायम आहे. जानेवारीत पहिल्यांदाच किमान तापमान पाच अंशांच्या खाली घसरले आहे. पुढील दोन दिवस सकाळी हलके ते मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस धुक्याचा यलो अलर्ट दिला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून राजधानीत आकाशात ढग दाटून आले होते. त्यामुळे सूर्य दर्शन झाले नाही तर कमाल तापमान देखील मोठी घाट होत होती. त्यामुळे नागरिकांना दिवसा देखील कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला.
मात्र, आता आकाश निरभ्र असून त्यासोबत थंड वारेही वाहू लागले आहेत. त्यामुळे किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. दिल्ली वेधशाळेने सफदरजंगयेथे गुरुवारी किमान तापमान ४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा २.१ अंशांनी कमी आहे. या वर्षी पहिल्यांदाच पारा पाच अंशांच्या खाली घसरला आहे. १६ डिसेंबर रोजी किमान तापमान ४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर किमान तापमान पाच अंशांपर्यंत खाली आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी हवामान ढगाळ राहणार असून शनिवारी हवामान निरभ्र राहील. रविवारी हवामान बदलेल आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आह. सोमवारीही हलका पाऊस पडू शकतो. मंगळवार आणि बुधवारी आकाश निरभ्र राहील. गुरुवारी पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.