Maharashtra Weather Update : कोकणात पावसाचा कहर! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : कोकणात पावसाचा कहर! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update : कोकणात पावसाचा कहर! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Jul 15, 2024 06:28 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन तीन दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 कोकणात पावसाचा कहर! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
कोकणात पावसाचा कहर! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट (PTI)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन तीन दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर, लातूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या संपूर्ण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ तारखेला मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार तर १६ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ व १८ तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या ४८ तासात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीला दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागासाठी आज रेड अलर्ट दिलेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस व सातारा येथील घाट विभागासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज दिलेला आहे. रायगड आणि पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागासाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांसाठी पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे तर परभणी, हिंगोली, अमरावती वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. उद्या १५ तारखेला आणि चंद्रपूर गडचिरोली व गोंदिया येथे आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात ४८ तासांत जोरदार बरसणार

पुणे व परिसरात येत्या ४८ तासात संततधार मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर