Maharashtra Weather Update: लोकसभा मतमोजणीवर पावसाचे सावट; राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: लोकसभा मतमोजणीवर पावसाचे सावट; राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: लोकसभा मतमोजणीवर पावसाचे सावट; राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता

Jun 04, 2024 06:06 AM IST

Maharashtra Weather Update: राज्यात लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. मात्र, या मतमोजणीवर पावसाचे सावट आहे. राज्यात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. मात्र, या मतमोजणीवर पावसाचे सावट आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. मात्र, या मतमोजणीवर पावसाचे सावट आहे. (HT)

Maharashtra weather update : राज्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. या मतमोजणीवर पावसाचे सावट आहे. आज राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग वगळता उर्वरित जिल्ह्यात पुढील एक ते दोन दिवस उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीत ४ ते ६ जूनला व सिंधुदुर्गमध्ये ४ ते ६ जूनपर्यंत मेघगर्जना विजांचा कडकडाट तर ताशी ४० ते ५० किलोमीटरच्या वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Election Results 2024 Live Updates : सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार ? आज होणार फैसला

मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या महितीनसुयर ठाण्यात ४ ते ६ जूनपर्यंत रायगडमध्ये ३ ते ५ जूनपर्यंत रत्नागिरीमध्ये ३ जूनला व सिंधुदुर्गमध्ये ४ जूनला मोजक्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे येथे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

LS Election Result: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? प्रतीक्षा संपली, लोकसभेच्या ५४३ जागांच्या निकालाचे काउंटडाउन सुरू

गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी व विदर्भात आणखी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पालघर व ठाण्यामध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग आजपासून पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे व उर्वरित जिल्ह्यांमध्ये सहा व सात जूनला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांच्या कडकडाटसह ताशी ४० ते ५० किलोमीटर होत आहे. वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Mumbai Hoardings : मुंबईतील म्हाडाच्या जमिनीवरील ६२ पैकी ६० होर्डिंग्ज बेकायदा, सोमय्या यांच्याकडून पोलिसांत तक्रार

पुण्यात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

पुणे व परिसरात आजपासून पुढील चार दिवस आकाश अंशतः दगड राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मॉन्सून लवकरच होणार राज्यात दाखल

नैऋत्य मौसमी पाऊस आज मध्यम अरबी समुद्र कर्नाटक, रायल सीमा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा आणखी काही भागात तेलंगणाच्या काही भागात पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसात मध्य अरबी समुद्र व कर्नाटकाच्या उर्वरित भागात दक्षिण महाराष्ट्र व गोव्याच्या आणखी काही भागात रायल सीमा तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या उर्वरित भागात दक्षिण छत्तीसगड व दक्षिण ओरिसाच्या व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर