Maharashtra weather Update : विदर्भात पावसाचा जोर कायम! आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा यलो अलर्ट-maharashtra weather update rain continues in vidarbha rain heavily in some district of state today imd yellow alert ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather Update : विदर्भात पावसाचा जोर कायम! आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा यलो अलर्ट

Maharashtra weather Update : विदर्भात पावसाचा जोर कायम! आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा यलो अलर्ट

Sep 05, 2024 05:34 AM IST

Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला विदर्भात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

 विदर्भात पावसाचा जोर कायम! आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा यलो अलर्ट
विदर्भात पावसाचा जोर कायम! आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा यलो अलर्ट

Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मराठवाडा येथील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यामध्ये पुढील पाच चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज धुळे नंदुरबार व जळगाव येथे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि धुळे नंदुरबार व जळगाव येथे येलो अलर्ट दिलेला आहे.

विदर्भामध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिलेला आहे. पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे ६, ७ व ८ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना ६, ७ व ८ तारखेला यलो अलर्ट दिलेला आहे.

पुणे कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात ६, ७ व ८ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ६, ७ आणि ८ तारखेला येलो अलर्ट दिलेला आहे.

पुण्यात तुरळक ठिकाणी पाऊस

पुणे परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ आणि ८ तारखेला पुण्याच्या घाट विभागासाठी यलो अलर्ट दिलेला आहे.