मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यावरील पावसाचे ढग काही जाईना; आजही पावसाचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यावरील पावसाचे ढग काही जाईना; आजही पावसाचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 04, 2024 05:10 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात मार्च महिन्यात देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. (weather news) मराठवाडा, विदर्भात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज देखील विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावरील पावसाचे ढग काही जाईना; आजही पावसाचा इशारा
राज्यावरील पावसाचे ढग काही जाईना; आजही पावसाचा इशारा (HT)

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट होत आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, पावसाचे हे संकट राज्यावर आणखी काही दिवस राहणार आहे. आज देखील विदर्भात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

lalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत १५ लाख लोकांसमोर लालूंची जोरदार फटकेबाजी

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार एक पश्चिमी विक्षोभ हवेतील वरच्या स्थरात चक्रवात स्थीतीत उत्तर पाकिस्तान आणि शेजारील भागात आहे. जो नॉर्थ ईस्टर्ली दिशेने पुढे सरकत आहे. या चक्रवातापासून एक द्रोणीय रेषा ईशान्य अरबी सागरा पर्यन्त आहे. ज्यामुळे उत्तर मध्य भारतातील आद्राता वाढेल. तसेच पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम पंजाब आणि लगतच्या भागांवर आहे. एक द्रोणीय रेषा नैऋत्य मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटकावर आहे. यामुळे पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र कोकण गोवा तुरळक ठिकाण अति हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह अति हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ तारखेनंतर राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ४ तारखेनंतर किमान तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे.

दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी मी मरणार; हिंगोलीत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह अख्खा गाव जमला, पण..

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि परिसरात आज आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. ४ आणि ५ तारखेला आकाश निरभ्र राहण्याचा तर ६ आणि ७ तारखेला आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. ७ तारखेनंतर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. उद्या सकाळ नंतर किमान तापमानात किमान ४ ते ५ डिग्री सेल्सिअसने किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात काही खास बदल होणार नाही.

दरम्यान, राज्यात रविवारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पुण्यात देखील ढगाळ हवामान होते. तर मुंबईत सध्या दमट आणि गरम हवामान आहे. तर काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान आहे.

IPL_Entry_Point