Maharashtra Weather Update : राज्यावर मोठ्या प्रमाणात पुर्व मौसमी पावसाचे ढग दाटून आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, बीड, जालना, नांदेड, तर विदर्भातील नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस, ठाणे जिल्हाला ५ ते ८ जून, मुंबईला ६ ते ८ जूनला वीजांचा कडकडाट व वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर पुणे सोलापूर या जिल्ह्यात आज तसेच सोलापूरला ७ जूनला वीजांचा कडकडाट वादळी वारे तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
५ जून ते ८ जून दरम्यान नाशिक, अहमदनगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ७ जून दरम्यान लातूर, दिनांक ४ ते ६ जून दरम्यान नांदेड, ५ जून दरम्यान जालना, परभणी या जिल्ह्यात व दिनांक ६ जून रोजी जालना, ५ जून रोजी हिंगोली येथे वीजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात आजपासून पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाला राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मौसमी पाऊस आज मध्य अरेबीयन समुद्र, कर्नाटक व तेलंगणाच्या आणखी काही भागात गोव्यात आणि रायल सीमेच्या आणखी काही भागाग दाखल झाला आहे. नैऋत्य मौसमी पाऊस पुढील तीन ते चार दिवस मध्य अरेबियंन समुद्र व कर्नाटकच्या काही भागात दक्षणी महाराष्ट्राच्या काही भागात आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीचा आणखी काही भागात दक्षिण छत्तीसगड व दक्षिण ओडिसाच्या पश्चिम बंगालच्या व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.