मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather Update : विदर्भातील 'या' जिल्ह्यांना बसणार गारपीटीचा तडाखा; हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

Maharashtra weather Update : विदर्भातील 'या' जिल्ह्यांना बसणार गारपीटीचा तडाखा; हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 19, 2024 07:22 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. खास करून विदर्भात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. आज देखील विदर्भात काही जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. खास करून विदर्भात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. खास करून विदर्भात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. (AP)

Maharashtra Weather News Update: विदर्भात आज देखील गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही जिल्ह्यात आज आणि उद्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज वाऱ्याची एक चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भ लगतच्या भागात आहे. तसेच वाऱ्याची एक परस्पर क्रिया दक्षिण तामिळनाडू ते पश्चिम विदर्भा पर्यन्त आहे. एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स २० मार्चला पश्चिम हिमालया पर्यन्त येणार असल्याने याचा परिमाण राज्याच्या हवामनमावर होणार आहे.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

कोकण आणि गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या ७२ तासांत तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. व त्यानंतर चार दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तर विदर्भात पुढील ४८ तासात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह काही परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सोबतच गारपीटीचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर २१ ते २४ मार्च पर्यन्त वातावरण कोरडे राहणार आहे.

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

आज विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील काही दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. उद्या आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन यामुळे पुणेकर हैराण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरीक घराबाहेर पडणे टाळत आहे.

IPL_Entry_Point