Maharashtra Weather Update : राज्यात संध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उष्ण हवामान नागरिक अनुभवत आहेत. तर काही भागात अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे. राज्यातील काही भागात दिवाळीत पावसाने हजेरी लावली होती. विशेषत: कोकणात अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत तापमानाचा पारा हा वाढत आहे.
हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज कोरडं हवामान राहणार आहे. मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे झालेल्या धूरामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. याचा परिमाण हवामानावर झाला आहे. राज्यात म्हणावी तशी थंडी अद्याप पडली नाही. काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
मुंबई, ठाणे व उपनगर भागात सध्या दमट व उष्ण वातावरण असून उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. विदर्भ-मराठवाड्यात देखील तापमान वाढले आहे. तर सकाळी आणि रात्री नागरिक हलका गारवा अनुभवत आहेत. उद्यापासून तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यात अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही. येत्या काही दिवसांनत हळू हळू थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसानंत तापमान काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणासहित तापमान वाढले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात पावसाची शक्यता असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.