मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update: पुणे, मुंबई गारठणार! विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात होणार घट; असे असेल हवामान

Maharashtra Weather update: पुणे, मुंबई गारठणार! विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात होणार घट; असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 02, 2024 06:55 AM IST

Maharashtra Weather update: पश्चिमी विक्षोभ एका द्रोणीका रेषेच्या रूपात तयार झाले असून त्याची वाटचाल ही पूर्वेकडे आहे. राज्यात पाच फेब्रुवारी पर्यंत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Winter Season In Maharashtra
Winter Season In Maharashtra (HT)

Maharashtra Weather update: पश्चिमी विक्षोभ एका द्रोणीका रेषेच्या रूपात तयार झाले असून त्याची वाटचाल ही पूर्वेकडे आहे. एक प्रभावी हवेची चक्रीय स्थिती नॉर्थ वेस्ट राजस्थानवर तयार झाले आहे. उत्तरेककडून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात थंड वारे येत असल्याने पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी वाढणार आहे. या सोबतच विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील थंडी वाढणार आहे. तापमानातील हा बदल ५ ते ६ फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार आहे. पुण्यात गुरुवारी तापमान हे १० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले होते. तसेच मुंबईतूंन थंडी गायब झाली होती. ती आता पुन्हा परतणार आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

NCP Split Verdict: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? १५ फेब्रुवारीला राहूल नार्वेकर सुनावणार फैसला

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ एका द्रोणीका रेषेच्या रूपात तयार झाले असून त्याची वाटचाल ही पूर्वेकडे आहे. एक प्रभावी हवेची चक्रीय स्थिती नॉर्थ वेस्ट राजस्थानवर तयार झाले आहे. जेट स्ट्रीम सोबत तीव्र हवा उत्तर भारतावर तयार झाली आहे. अजून एक द्रोणिका रेषा पश्चिम विदर्भ ते उत्तर तमिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळे आद्रता राज्यात येत आहे. पुढील ४८ तासात राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात तसेच पुण्यात उत्तरेकडून थंड वारे येत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परंतु नवीन पश्चिमी विक्षोभ नॉर्थ वेस्ट इंडियावरून ३ फेब्रुवारी पासून पुढे येत आहेत. त्यामुळे तीन चार फेब्रुवारीला किमान तापमानात जास्त बदल होईल. ५ फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असेल. तसेच उत्तरी वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होण्याची सुद्धा शक्यता आहे.

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

असे राहील पुण्याचे तापमान

पुण्यात व परिसरात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तीन चार फेब्रुवारीला आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहील. भारतात तासात हलके धुके पडण्याची शक्यता राहील. ४८ तासात किमान तापमानात साधारण दोन डिग्रीने घट होईल. पुण्यात ५ फेब्रुवारी नंतर सलग तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहील. उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात तीन डिग्री सेल्सिअसणे घट होईल. चार पाच सहा फेब्रुवारीला कमान तापमानात घट होईल त्यामुळे दिवसा थंडी जाणवणार आहे.

उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे.

देशात उत्तरेत थंडीचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्ली आणि कानी परिसरात दिला आहे. या सोबत पर्वतीय रांगांमध्ये हीमवर्षाव सुरू असून यामुळे देखील मोठ्या प्रमाणात थंड वारे हे राज्याच्या दिशेने येत आहे. तसेच तयार झालेल्या चक्रिय स्थितीमुळे देखील राज्याच्या तापमानात बदल होत आहेत.

WhatsApp channel