Maharashtra Weather Update : राज्यात पारा घसरला आहे. पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात पारा खाली आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री आणि पहाटे कमालीची थंडी पडत आहे. पुण्यात आज हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. १२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवस शहराच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात विशेषत: किमान तापमानात कमालीचा बदल होत आहे. १३ नोव्हेंबर रोजी १४.६ अंश सेल्सिअसच्या सामान्य पातळीपेक्षा कमी तापमानाचा अनुभव नागरिकांनी घेतल्यानंतर शहराच्या किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. ३ दिवसात किमान तापमान २०.५ अंशांवर पोहोचले, जे सामान्य तापमानापेक्षा ५.८ अंश सेल्सिअसने जास्त होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. १७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगरमध्ये किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे २४ तासांत ४ अंशांनी घसरले होते आणि १८ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यात आणखी २ अंशांची घसरण झाली. मंगळवारी, १९ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक किमान तापमान १४ अंश सेल्सिअस असताना, यंदा नोव्हेंबरमध्ये शहरात २ अंशांनी कमी तापमानाची नोंद झाली आहे.
शहराच्या इतर भागातही किमान तापमानात लक्षणीय घट झाली. एनडीए, बारामती, हवेलीसह तीन भागात तापमान ११ अंशांपर्यंत घसरले. शिवाजीनगर व्यतिरिक्त इतर चार स्थानकांवरही किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन ते तीन दिवस शहरात तापमानात ही घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात झालेली ही घट मुख्यत्वे उत्तरेकडील थंड वारे शहरात दाखल झाल्यामुळे आहे. आयएमडीने जारी केलेल्या अधिकृत अंदाजानुसार, २५ नोव्हेंबरपर्यंत शहरात पहाटे आणि संध्याकाळी कोरडे हवामान आणि धुके पडण्याची शक्यता आहे.
सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा राज्यातील हवामानावर परिणाम होत आहे. सापेक्ष आर्द्रता १०-१५ टक्क्यांनी कमी झाली असून ढगांचे आच्छादनही कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात तापमानात घट होत आहे. पुढील ३-४ दिवसांपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पूर्वेकडील वारे महाराष्ट्रात अधिक आर्द्रता आणतील, असे हवामान विभागाचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले.
पुणे शहरात किमान तापमानासोबत कमाल तापमानातही घट होत आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत तापमानात २ अंशांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार. १८ नोव्हेंबर रोजी शहराचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर १९ नोव्हेंबर रोजी विचभा २९.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
शिवाजीनगर १२.९
पाषाण १३.३
लोहेगाव १५.१
चिंचवड १८.१
मगरपट्टा १८.६