Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर मुंबईसह 'या' ठिकाणी यलो अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर मुंबईसह 'या' ठिकाणी यलो अलर्ट

Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर मुंबईसह 'या' ठिकाणी यलो अलर्ट

Aug 01, 2024 07:20 AM IST

Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने घाट माथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर मुंबईसह 'या' ठिकाणी यलो अलर्ट
राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर मुंबईसह 'या' ठिकाणी यलो अलर्ट (Hindustan Times)

Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. राज्यातील किनारपट्टी भाग, घाटमाथा, विदर्भात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर घाटमाथ्यावर मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नुसार आज गुरुवारी कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान सक्रिय आहे. त्यानुसार १ ऑगस्ट रोजी कोकणात व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रायगड रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात २४ तासांत अत्यंत जोरदार म्हणजे २०५ किलोमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

उद्या २ ऑगस्ट रोजी पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचा घाट विभागात तुरळक ठिकाणी पुढील २४ तासांत अत्यंत जोरदार म्हणजेच २०५ मीमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गमध्ये खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ ऑगस्टला रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आल्या आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काहीच सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर १ ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात तर चार ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व कोकणातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे शहर व परिसरात पुढील तीन दिवस आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक ३ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार तर काही ठिकाणी खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर