Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केलं आहे. शनिवारी राज्यात बऱ्याच जिल्ह्यात तुफान हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहे. आज देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुळसाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर बंगालचा उपसागर व लगतच्या बांगलादेश पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज दक्षिण बांगलादेश व लगतच्या भागावर आहे. त्यामुळे विदर्भात पुढील पाच ते सात बहुतांश ठिकाणी तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज छत्रपती संभाजी नगर नांदेड लातूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर कोकण, गोवा, नाशिक, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ व १९ तारखेला पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, धाराशिव, लातूर व नांदेड हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे १९ व १९ तारखेला वरील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
२० तारखेला मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तर मराठवाडा विदर्भ व कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २१ तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये व रायगड सिंधुदुर्ग सोलापूर येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे शहर व परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी समान्यत: ढगाळ राहून मेघ गर्जना व वीजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी काही दिवस आकाश ढगाळ राहून पासवाच हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.