Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात नागरिक अनुभवताय पावसाळा, उन्हाळा! पावसासह तापमान वाढीचा IMD चा अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात नागरिक अनुभवताय पावसाळा, उन्हाळा! पावसासह तापमान वाढीचा IMD चा अलर्ट

Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात नागरिक अनुभवताय पावसाळा, उन्हाळा! पावसासह तापमान वाढीचा IMD चा अलर्ट

Dec 04, 2024 07:24 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढीसोबरच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हा परिणाम झाला आहे.

ऐन हिवाळ्यात नागरिक अनुभवताय पावसाळा, उन्हाळा! पावसासह तापमान वाढीचा IMD चा अलर्ट
ऐन हिवाळ्यात नागरिक अनुभवताय पावसाळा, उन्हाळा! पावसासह तापमान वाढीचा IMD चा अलर्ट (HT_PRINT)

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावर मोठा परिमाण झाला आहे. या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्याचा प्रभाव असल्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, तापमानात देखील मोठी वाढ झाल्याने नागरिक उष्णतेने बेहाल झाले होते. मंगळवारी मोठ्या गरमी दमट हवामान असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतर भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान हे १७ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक तापमान असून कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे देखील तापमान वाढले आहे. या सोबतच या ठिकाणी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. सांगली, सातारा, पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. तर काही भागात हवामान हे ढगाळ राहणार आहे.

या जिल्ह्यात पावसाची शक्यता

पुणे, कोल्हापूर, घाटपरिसर, सातारा, सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यात येत्या २४ तासात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात थंडी कमी झाली असून वातावरण कोरडं व ढगाळ वाराहणार आहे. ८ ते १० डिसेंबरपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून त्यानंतर उष्णता व पाऊस कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यात ३ ते ६ डिग्री तापमान वाढले आहे. तर रात्री साधारण २० ते २२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईकरांनाही थंडीची प्रतीक्षा

चक्रीवादळामुळे मुंबईच्या हवामानावर देखील परिणाम झाला आहे. शहरात नागरिक उष्णतेने हैराण झाले आहे. पुढील काही दिवस हे चित्र कायम राहणार असून ढगाळ वातावरण राहणार असून मात्र, हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडणार नाही डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळातही थंडीचं प्रमाण कमीच राहणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर