मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला अलर्ट

Jun 28, 2024 06:49 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे येथे ऑरेंज तर विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला अलर्ट
राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार! पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला अलर्ट (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यात पूढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, ठाणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. २७ जून ते ३१ जून, १ जुलै रोजी कोकण, गोव्यात, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पुणे, सातारा येथे पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने उत्तर अरबी समुद्राचा उर्वरित भाग, गुजरात राज्य, राजस्थानचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, बिहार, पुर्व उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तराखंडचा बहुतांश भाग, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाबचा आणखी काही भाग व्यापला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने २७ जून ते ३१ जून, १ जुलै रोजी कोकण, गोव्यात, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक २८ जून रोजी संपूर्ण विदर्भात व मराठवाड्याच्या व उत्तर भारत, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात बहुतांश जिल्ह्यात यलो अलर्ट

२८ जून रोजी विदर्भातील बहुतांश ठिकाणी तर २९ व ३० जून आणि १ जुलै रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. २८ जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर २९ जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे तर ३० जून रोजी पालघर व ठाणे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. २७ जून ते ३० जूनपर्यंत सातारा जिल्ह्यात घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात २९ जून ते १ जुलैपर्यंत घाट विभागात तुरळक ठिकाणी मुळसाधार पावसाची शक्यता आहे. दिनांक ३० जून ते १ जुलै रोजी पुणे जिल्हा व १ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामले तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट

पुणे शहर व परिसरात आज पासून पुढील काही दिवस आकाश समान्यत: ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel
विभाग