Maharashtra Weather update : नैऋत्य पावसाची उत्तरी सीमा आज कायम आहे. त्यामुळे मान्सून पुढील २४ तासात केरळमध्ये दाखवण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग मालदीव व कामोरियचा उर्वरित भाग लक्ष्यद्वीप काही भाग नैऋत्य मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरातला काही भाग आणि ईशान्ये कडील राज्यांचा काही भाग व्यापण्यात परिस्थिती अनुकूल आहे. दरम्यान, मॉन्सून देशात धडकणार असला तरी उष्णतेची लाट कायम आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भात नागपूर, वर्धा, तर आज व उद्या चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून एक जून पर्यंत कोकणात पालघर ठाणे व मुंबई तसेच ३१ व १ जून रोजी रायगड येथे हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोकण, गोव्यात पुढील पाचही दिवस तर मराठवाड्यात आज व मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात ३१ मे नंतर तर विदर्भात १ जून नंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात उद्या ठाणे व मुंबई तर ३१ व १ जून रोजी तर रायगड येथे दुपारी किंवा संध्याकाळ नंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक व दोन जून रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील लातूर धाराशिव तसेच विदर्भातील गडचिरोली गोंदिया व नागपूर येथे मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिनांक २ जून रोजी कोल्हापूर, सातारा, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ८ जून पासून पुढील पाचही दिवस उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहर व परिसरात आज पासून पुढील चार दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर पुढील तीन दिवस अंशत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह वीजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तापमानात घट झाली आहे. पुण्यात बुधवारी ३५.७ डिग्रीसेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात विदर्भात उन्हाचा कडक कायम आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी चंद्रपूर जवळील ब्रम्हपुरी येथे तापमान सर्वाधिक होते येथे ४७.७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उस्मानाबाद येथे ३९.३, औरंगाद येथे ४०, परभणी ४२, नांदेड़ २८ बीड ४१.७, अकोला ४२.६, अमरावती ४३,८, बुलढाणा ३८.२, ब्रम्हपुरी ४६.७, चंद्रपुर ४४.२, गोंदिया ४४, नागपुर ४५.२, वाशिम ४२.६, वर्धा ४५.२, यवतमाळ ४४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या