Maharashtra Weather Update : राज्यात संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस कोकण, गोव्यात तापमान वाढणार आहे. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (तास ४०-५०) किमी वेगाने) येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याने यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भापर्यंत असलेली वाऱ्याची द्रोणिका रेषा आज देखील विदर्भ मराठवाडा कर्नाटक आणि तमिळनाडू पर्यंत जात असल्याने पुढील काही दिवस राज्यात हवमान कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गर्मी वाढणार आहे तर कोकण गोव्यामध्ये वातावरण उष्ण व दमट राहणार आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. काही जिल्ह्यात तापमानात वाढणार आहे तर काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर आज आणि उद्या विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (तास ४०-५०किमी वेगाने) येण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहणार आहे. तर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात रविवारी ३८.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान थोडे कमी झाले असून ढगाळ हवामानामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला आहे.