Maharashtra weather Update : राज्यातीत आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. हवामान विभागाने आज कोणत्याही जिल्ह्यांना पवसवाच अलर्ट दिलेला नाही. राज्यात आज काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज काही ठिकाणी हलक्या पावसाच्या कोसळण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर आहे. तर कोकण गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ तारखेपासून कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ तारखेपासून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र १७ तारखेपासून काही ठिकाणी आणि १९ तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यामध्ये पुढील दोन तीन ते चार दिवस हलक्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात पुढील चार ते पाच दिवस रोज ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण भागात आज कुठेही पावसाचा इशारा म्हणजेच अलर्ट दिलेला नाही.
पुण्यात आज हवामान कोरडे राहणार असून अधून मधून ढगाळ हवामान राहणार आहे. घाट विभागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, यानंतर पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.