Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परतीच्या पावसाची तीव्रता कमी झाली आहे. आज काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर वाऱ्याची द्रोणीय रेषा उत्तर कोकण ते आग्नेय उत्तर प्रदेश पर्यंत आहे. त्यामुळे आज विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, गोव्यात सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यात नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर अधून मधून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर घाट विभगात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.