Maharashtra Weather Update : नैऋत्य व लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. राज्यात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ तारखेला कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांनपासून थंडी वाढली आहे. वातावरणात बदल झाला असून सकाळी धुके आणि थंडी पडत असून दुपारी ऊन पडतो. काही शहरांत थंडी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत तापमानात घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. बुधवारीही देखील सकाळी २० अंशाच्या आसपास राहिला. तर गुरुवार ते रविवारी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात हळू हळू कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडी वाढू लागली असून काही जिल्ह्यात तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, जळगाव, महाबळेश्वर, नांदेड नंदुरबार, नाशिक, परभणी, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे.
उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. पुणे व परिसरात आज पासून पुढील दोन दिवस आकाश मुख्यता निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी आकाश मुख्यता निरभ्र राहून अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.