Maharashtra Weather Update : कोकणासह 'या' जिल्ह्यात बरसणार! आयएमडीने दिला यलो अलर्ट; राज्यात पावसाचा जोर झाला कमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : कोकणासह 'या' जिल्ह्यात बरसणार! आयएमडीने दिला यलो अलर्ट; राज्यात पावसाचा जोर झाला कमी

Maharashtra Weather Update : कोकणासह 'या' जिल्ह्यात बरसणार! आयएमडीने दिला यलो अलर्ट; राज्यात पावसाचा जोर झाला कमी

Published Jul 30, 2024 06:32 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने येथील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे.

कोकणासह 'या' जिल्ह्यात बरसणार! आयएमडीने दिला यलो अलर्ट; राज्यात पावसाचा जोर झाला कमी
कोकणासह 'या' जिल्ह्यात बरसणार! आयएमडीने दिला यलो अलर्ट; राज्यात पावसाचा जोर झाला कमी (Hindustan Times)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने येथील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज ३० जुलै रोजी कोकणात, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर रायगड जिल्ह्यात १ ऑगस्टला तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट दिला आहे.

आज मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात, कोकणात पुढील काही दिवस विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. ३१ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोरदार सरी पडण्याची शक्यता असल्याने पुण्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर