Maharashtra Weather Update: पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला महत्वाचा इशारा; वाचा-maharashtra weather update it will rain heavily today in some districts of state including pune important warning given ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला महत्वाचा इशारा; वाचा

Maharashtra Weather Update: पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला महत्वाचा इशारा; वाचा

Aug 09, 2024 07:09 AM IST

Maharashtra Weather Update: पुण्याला आज हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला महत्वाचा इशारा; वाचा
पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; IMD नं दिला महत्वाचा इशारा; वाचा (Hindustan Times)

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असला तरी काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आणि कोकणातील काही जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज देखील राज्याच्या घाट विभागात व मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, पुणे, रायगड, धुळे, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातवरून उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर आहे व त्याची तीव्रता कमी आहे. आज कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

आज पासून पुढील दोन दिवस म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात आज व उद्या तर रायगड जिल्ह्यात आज तर रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर आज धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्ह्यात व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सोबतच अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात आणि दहा ते बारा ऑगस्ट पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात असाच पाऊस अपेक्षित असल्याने या सर्व ठिकाणी सुद्धा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यातील घाट विभागात पावसाचा जोर कायम

पुणे आणि परिसरासाठी आजपासून पुढील तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने घाट क्षेत्रासाठी दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विभाग