Maharashtra Weather Update : राज्यात आज 'या' भागात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात आज 'या' भागात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात आज 'या' भागात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Oct 05, 2024 07:21 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे.

राज्यात आज 'या' भागात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
राज्यात आज 'या' भागात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यातून मॉन्सून माघारी फिरला असला तरी काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज पाऊस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये ठाणे व रायगडला ६ तारखेला तर रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये ५, ६ व सात तारखेला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सात तारखेला बऱ्याच जिल्ह्यात तर आठ तारखेला संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

पुण्यात असे असेल हवामान

पुण्यात पुढील काही दिवस हवामान अंशत: ढगाळ राहून दुपारी आकाश निरभ्र राहणार आहे. तर दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर हीट वाढणार

राज्यात अनेक जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही जिल्ह्यात तापमान ३८ च्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत ऑक्टोबर हीटचा परिमाण जाणवणार आहे. त्यामुळे बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षी थंडीचा परिमाण देखील जास्त जाणवणार आहे. मोठ्या प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर