Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे राज्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रायगड, पुणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
समुद्र सपाटीवरील कमी दाबचा पट्टा आज दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत समांतर आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार आज कोकण व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस राज्यात बहुतांशी ठिकाणी, विदर्भामध्ये पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी तर मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पुणे, कोल्हापूर व साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार व नाशिक येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना व वीजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आज आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.