Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या दोन दिवस जोरदार पाऊस पडतोय. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होत असून काही तास पडणाऱ्या पावसामुळे नगरिकांची त्रेधा उडत आहे. रविवार प्रमाणेच सोमवारी देखील पाऊस झाला. सोमवारी नाशिक आणि पुण्यात झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, आज देखील हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटासह हा पाऊस होणार आहे.
राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस पावसाची शक्यता आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आजही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी नाशिकला झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते.
दरम्यान, आज देखील या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धारशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना आज मंगळवारी देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा दक्षिण बांगलादेश व लगतच्या भागावर स्थिर आहे. उद्यापर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना आज मंगळवारी देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरासाठी आज देखील यलो अलर्ट देणीत आला आहे. पुण्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा यलो अलर्ट देण्यात आला आहे.