Maharashtra Weather Update : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट! राज्यातील पुणे, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट! राज्यातील पुणे, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार

Maharashtra Weather Update : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट! राज्यातील पुणे, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार

Oct 09, 2024 07:27 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात पाऊस पडणार असून हवामान विभागाने पासवाच यलो अलर्ट जारी केला आहे.

 राज्यावर पुन्हा अस्मानी संकट! राज्यातील पुणे, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार
राज्यावर पुन्हा अस्मानी संकट! राज्यातील पुणे, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस नैऋत्य मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील चार उपविभागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहे. कोकण, गोव्यामध्ये आज व उद्या काही ठिकाणी तर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी तर पुढील दोन दिवस म्हणजेच १० व ११ ऑक्टोबरला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील सातही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात सुद्धा पुढील दोन दिवस काही ठिकाणी त्यानंतर चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यात नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

आज ९ तारखेला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे व वीजांच्या कडकडासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० तारखेला रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा व मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हयामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ तारखेला मध्य महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्चना व विजांचा कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ तारखेला अहमदनगर व पुणे जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात असे राहील हवामान 

पुण्यात पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर