Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील आज बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासाह वीजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, ठण्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, तर विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.
पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुयासर उत्तर भारतातील व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर स्थितीत आहे. कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ७ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. २४ व २५ तारखेला रायगड व रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११५.६ मिलिमीटर ते २०४.४ मिलिमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना २४ ते २५ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव व सांगली येथे पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी पुढील दोन ते तीन दिवस येल्लो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भामध्ये पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागात पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे. चंद्रपूर गडचिरोली व गोंदिया येथे २५ तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना २५ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश दुपारी व संध्याकाळी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडगडाचा सहित मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. आज पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी येल्लो अलर्ट दिला आहे. २३ तारखेपासून पुढे चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे.