Maharashtra Weather update : राज्याच्या तापमानात हळूहळू वाढ होत आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे थोडीशी आद्रता घेऊन येत असल्याने राज्यात विदर्भ मराठवाड्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. आज, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १५ फेब्रुवारीनंतर तापमानात हळू हळू घट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीर आणि पंजाब वरून पूर्वेकडे येत आहे. ते जसे जसे उत्तर मध्य भारतावरून पुढे येत आहे तास तसे ढगाळ वातावरण कमी होत आहे. एक द्रोणीका रेषा साऊथ ईस्ट मध्य प्रदेश व उत्तर मध्य कर्नाटकापर्यंत आहे. व ही द्रोणीका रेषा पुढील काही दिवस सक्रिय राहणार आहे. या द्रोणीका रेषेमुळे साऊथ ईस्टर्ली किंवा साऊथ साऊथ ईस्टर्ली वारे बंगालच्या उपसागरावरून थोडीशी आद्रता राज्याच्या साऊथ ईस्टर्ली भागात घेऊन येत आहे. ९ फेवरुवारी नंतर अजून जास्त आद्रता घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत मराठवाडा व विदर्भात ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुण्यासहित उत्तर मध्य भागात हवामान कोरडे राहील. त्याच सोबत थोडीशी उत्तरी वाऱ्यामुळे किमान तापमानात आठ फेब्रुवारी पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. ९ पेब्रुवारीनंतर पुढील तीन-चार दिवस आद्रता वाढल्यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होईल.
पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल पुण्यात आजपासून ८ फेब्रुवारी पर्यंत किमान तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअस ने घट होईल. नऊ ते बारा फेब्रुवारी मध्ये किमान तापमानात साधारण दोन डिग्रीने वाढ होईल.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. दिल्ली, ऊतर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात थंड वाऱ्यांचा प्रभाव असून अजून काही दिवस या ठिकाणी गारठा कायम राहणार आहे. राजधानी दिल्ली येथे देखील थंडी कायम असून यामुळे अनेक नागरिक प्रभावित झाले आहे. हिमालयावरुन येणारे थंड वाऱ्यामुळे या ठिकाणी थंडीत वाढ झाली आहे.