Maharashtra Weather Update : राज्यात र्नैऋत्य मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. यामुळे कमाल तापमान तीन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात जून संपत आला तरी उन्हाच्या झळा कायम आहेत. तर विदर्भात अमरावती पर्यंत धडक मारलेल्या मॉन्सून तेथेच रेंगाळला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी वाऱ्याची स्थिती स्थिर आहे. द्रोणीका रेषा ही ईशान्य समुद्र व लगतच्या सौराष्ट्र ते पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत आहे. आज व उद्या कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात आज मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किमी वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगडला १९ ते २० जूनला रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये 18 ते 20 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज व उद्याच्या वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासाह तुरळक ठिकाणी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यम महाराष्ट्र व मराठवाड्यात दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर पुढील तीन दिवस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात आज पासून पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात व परिसरात पुढील ३ दिवस आकाश अंशत: ढगाळ राहील तसेच पावसाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे. रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. राज्यात सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. . मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.
संबंधित बातम्या