मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! 'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! 'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

Jun 24, 2024 05:20 AM IST

Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे पावसाचा जोर वाढणार आहे. तर कोकण, मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! 'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन
महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! 'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन (ANI)

Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सूनने बहुतांश जिल्ह्यात हजरे लावली आहे. रविवारी मुंबईत आणि पुण्यात व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या उर्वरीत भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील विजांच्या कडकाडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आल आहे. मुंबईत पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. तर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नैऋत्य मौसमी वारे २४ जून रोजी अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग महाराष्ट्राचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश व छत्तीसगढचा आणखी काही भाग, ओडिसा उर्वरित भाग आणि झारखंडच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. त्याची उत्तरी सीमा अरबी समुद्राच्या २०.५ उत्तर अक्षांश वेळावर, रजपिपला, उज्जैन, विदिशा सिद्धी, चैबासा, भकुर, साहेब गंज आणि रेक्ससोल वरून जात आहे. त्याची पुढील तीन ते चार दिवसात उत्तरी अरबी समुद्र गुजरात व मध्यप्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेश उत्तराखंडचा काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. समुद्र सपाटीवरील द्रोनीका रेषा आज महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी लगत आहे. तसेच वातावरणाच्या मधल्या थरात दक्षिण छत्तीसगड ते दक्षिण महाराष्ट्र पर्यंत एक द्रोणीय रेषा जात आहे.

या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार

आज पासून पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात आज व २७ जूनला बऱ्याच आणि २४ ते २६ जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक २३ जून ते २७ जूनपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तर सातारा व कोल्हापूरच्या घाट विभागात २४ ते २७ दरम्यान, रायगड जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात २६ व २७ जूनला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भात पुढील पाच दिवस मेघ गर्जना, विजांचा कडकडाट ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर २५ जूनला पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुण्याला रविवारी पावसाने चांगलेच झोडपले. पिंपरी चिंचवड परिसरात तासाभरात ढगफूटी सादृश्य पाऊस झाला. यामुळे येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. एका तासात सुमारे ११४ मिमी पावसाची नोंद झाली. आज देखील पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात आज पासून पुढील चार दिवस आकाश संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर हलक्या पावसाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता वाढून अधून मधून हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर