Maharashtra Weather Update : राज्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. कधी थंडी पडत आहे तर कधी उष्णता. सध्या राज्यात सकाळी आणि रात्री गारठा जाणवत आहे. तर दिवसा प्रचंड उकाडा जानवत आहे. फेब्रुवारी हा थंडीचा महिना असला तरी पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात उन्हाची तीव्रता ही वाढू लागली आहे. राज्यात पुढील २ ते ४ दिवसांत किमान व कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. राज्यात फेब्रुवारीपासून तापमान वाढीला सुरुवात होणार आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात असून येत्या काही दिवसात राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यात येत्या ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होणार असून उष्णता वाढणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढणार असून त्यानंतर तापमानात थोडी घट होणार आहे. विदर्भात मात्र, तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, पुढील काही दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे व शुष्क राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत रविवारी कुलाब्यात २०.८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ येथील केंद्रांवर १८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील १२ ते १६ अंशांची नोंद झाली असून पुण्यात १४ ते १६ अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं.
पुण्यात देखील पुढील काही दिवस कोरडे वातावरण राहणार आहे. सकाळी व रात्री गारठा जाणवत असून दुपारी मात्र, उकाडा जाणवणार आहे. तर मराठवाड्यात देखील बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या