Maharashtra Weather update : मॉन्सूनने राज्यात प्रगती केली आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भात अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. असे असले तरी . विदर्भात पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई देखील म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. मुंबईच्या तापमानात घट झाली असली तरी जून महिन्याची सरासरी पावसाने गाठलेले नाही. या महिन्यात पावसाची तुट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत पुढील २४ तासात ढगाळ हवामान राहणार असून काही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईचे तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
पुण्यात देखील आज ढगाळ हवामान राहणार आहे. पुण्यात बुधवारी काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पुण्यात आज देखील काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर घाट विभागात पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळलण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या