Maharashtra Weather Forecast उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. पुढील २३ तासांत याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुळसाधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
१५ ते १६ आणि १७ सप्टेंबरल दरम्यान कोकणात आणि गोव्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात घाट विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. १६ आणि १७ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात १५ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १६ आणि १७ सप्टेंबरला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मारठवड्यातील हिंगोली, नांदेड परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. विदर्भात १५, १६ आणि १७ सप्टेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, अमरावती अकोला जिल्ह्यात आज पासून पुढील १६ तारखेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात १४ ते १६ दरम्यान, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण गोव्यात १६ तारखेला, विदर्भात १४ ते १६ तारखेला तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात १४ ते १६ तारखेला मेघगर्जणेसह वीजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी वातावरण हे दमट राहणार असल्याने वातावरणातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे परिसरात आज सामान्यत: ढगाळ राहून हलका पाऊस पडणार आहे. १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान, आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १७ ते १८ सप्टेंबरला आकाश पूर्णत: ढगाळ राहून घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ सप्टेंबरला आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ आणि १६ आणि १७ तारखेला घाट विभागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.