Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २० तारखेपर्यंत कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पासून पुढील २० तारखेपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर ठाणे मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्याला यलो तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे. पश्चिम बंगालचाउप सागर व दक्षिण ओडीसाच्या किनारालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण छत्तीसगड व लगतच्या विदर्भावर आहे. आज कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात आज रायगडमध्ये काही ठिकाणी खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील आज कोल्हापूर व साताऱ्यातील घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाट विजांच्या कडकडाटासह अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे जोरदार व पुण्यातील घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आज सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व साताऱ्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ दिवस मराठवाड्यातील काही जिल्हे व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्य मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या