Maharashtra weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार होत आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील दोन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने २०, २१ आणि २२ तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज पासून पुढील तीन दिवस विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि २१) मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे तर २२ सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व २३ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर व उपनगरात पुढील काही तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तयार तर तापमान देखील ३२ अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार आहे.
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपार व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर उद्या २० सप्टेंबर रोजी आकाश ढगाळ राहून दुपार संध्याकाळी हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.