Maharashtra Weather Update : मुंबई, उपनगरे आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार तुरळ ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षीचा इशारा म्हणजे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे व सातारा येथील घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर ठाणे मुंबई कोल्हापूर व रायगड येथे मेगगर्जनेसह विजांच्या कडकडटासह पाऊस होण्याची शक्यत आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील रेड आणि ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरस्थिती येण्याची शक्यता असल्याने हवमान विभागाने सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देखील दिला आहे. हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज समुद्री सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारी पट्टीपर्यंत स्थिर आहे. कोकण गोवा व विदर्भात आज बहुतेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर उद्या व परवा कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज कोकण गोवा, तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज ९ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जुलै रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ व १२ जुलैला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षीचा इशारा म्हणजे रेड अलर्ट दिलेला आहे.
आज पुणे व सातारा येथील घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूर व रायगड येथे आज मेघ गर्जना व विजांच्या कडकडासहीत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या १० जुलै रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे व सातारा येथील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज आकाश सामान्यता ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज घाट विभागासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी पुढील चार ते पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
संबंधित बातम्या