weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढत असून गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता हवामान विभागाने पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. येत्या काही तासात मुंबई, कोकण, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पुढील २४ तास हवामान ढगाळ राहणार असून,काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई,ठाणे,पालघर,पुणे,सातारा,सिंधुदुर्ग आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने बुधवारपर्यंत म्हणजेच पुढील तीन-चार दिवस कोकण,मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भात तुरकळ तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ३० जून ते ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून ते १ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढचे चार दिवस मघेगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आज ३० जून ते१जूलैपर्यंत जोरदार पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडणार आहे.
संबंधित बातम्या