Maharashtra Weather Update : राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. तसेच कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात बदल होणार नाही. रविवारी सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथील तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. तर सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नोंदवले गेले. येथे ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उन्हाचा चटका वाढला असून थंडी जळवपास पूर्ण गायब झाली आहे. आधी सकाळी व संध्याकाळी गारठा जाणवत होता. मात्र, आता तो देखील जाणवत नसल्याने जिवाची लाही लाही होत आहे. रविवारी पुण्यात किमान तापमान हे १६.४ तर कमाल तापमान ३४.४ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले.
राज्यात चारही विभगात उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ९ नंतर प्रखर ऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान व कमाल तापमान देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येत्या २४ तासात यात आणखी १ ते २ अंश सेल्सिअसनए वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यात सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे ३५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. दरम्यान, पुढील काही दिवसांत आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पारा हा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक तापमान हे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात बदल झाला नसला तरी उष्णतेच्या तिव्रतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असून त्यानंतर तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सिअसणे वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ३ दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने छत्री किंवा डोक्यावर टोपी घालून बाहेर पडावे तसेच सोबत पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. तसेच शक्यतोवर दुपारी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
संबंधित बातम्या