Maharashtra IMD Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल झाले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसांत तपमनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सकाळी आणि रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या हिमाचल प्रदेश राजस्थान पंजाब या भागात दोन दिवस कडाक्याच्या थंडीसह प्रचंड गारठा पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिणेत तमिळनाडू, केरळ भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर देखील दिसून येणार आहे. त्यामुळे राज्यातील थंडीसाठी तयार झालेल्या वातावरणात बदल होऊन येत्या ४८ तासांत किमान तापमानात काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तापमानात मोठी वाढ होणार आहे. साधारण ३ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसात कमाल तापमानात देखील वाढ होणार आहे. तर त्यानंतर काही दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही. विदर्भात देखील येत्या होण्याची शक्यता आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठे चढ उतार दिसून येत आहे. पुण्यात सकाळी विरळ धुके पडत असून रात्री आणि सकाळी थंडी पडत आहे. तर दिवसा मात्र, कडक ऊन पडत आहे. सकाळी १० नंतर कडक ऊन पडत आहे. त्यामुळे उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान वाढ झाली आहे. तर कोरड्या व शुष्क वाऱ्यांमुळे सकाळी गारठा अधिक जाणवत आहे. तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. राज्यात तापमानाचा पारा २९ अंशापासून ३८ अंशापर्यंत आला आहे. कोकणात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस होते तर ठाण्यात व पालघर जिल्ह्यात देखील तापमान वाढले आहे.
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील तापमानात वाढ झाली आहे. येथील कमाल पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तर पुढील दोन दिवस किमान तापमानात देखील वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या