Maharashtra IMD Weather Update: राज्यात तापमानात अनेक चढ उतार पहायाल मिळत आहे. राज्यातून थंडी ओसरली आहे. जानेवारी महिना संपत आला असून अनेक जिल्ह्यात थंडी कमी झालेली आहे. असे असले तरी सकाळ-संध्याकाळ वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दोन नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले असून ते धडकणार आहेत. त्यामुळे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात याच परिमाण होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात याचा परिणाम दिसणार तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. उत्तरेत भागात पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. तर दक्षिणेकडील राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे. पुढील २४ तासात किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्णतेची झळ बसणार आहे. राज्याच्या किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेशात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडील राज्यात काही ठिकाणी बर्फवृष्टीही होण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ मध्ये ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडी पुन्हा वाढणार आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीत ९.०५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान १८.०१ सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे. आज आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळ-संध्याकाळ थंडी जाणवत आहे. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा बसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महाराष्ट्रात मात्र, किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.
पुण्यात देखील हवामानात मोठे बदल होत आहे. पुण्यात तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पुण्यात पडत आहे. पुण्यात मंगळवारी १२ ते १६ अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान होते. पुण्यात पुढील काही दिवस सकाळी आणि रात्री गारठा वाढणार आहे. तर दुपारी ऊन पडणार आहे. सकाळी विरळ धुके पडणार आहे. सातारा सोलापूरमध्ये देखील तापमान वाढले होते. नाशिकच्या कळवणमध्ये १५ तर विल्होली मध्ये २० अंश सेल्सिअस तापमान होते. तर मुंबईत कुलाब्यात २१.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या