Maharashtra weather update : पुढील काही दिवसात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात आज देखील पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. नागपूर, गरडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात काल हलक्या पावसाने हजेरी लावली होती. तर मोठ्या प्रमाणात धुके देखील होते. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात थंडीने नागरिक गारठले आहेत.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक वाऱ्याची चक्रिय स्थिती मराठवाडा आणि विदर्भाच्या लगतच्या भागावर आहे. तसेच प्रती चक्रवातीय वाऱ्यामुळे बंगालच्या उपसगागरातून आद्रता येत आहे. विशेषत: याचे प्रमाण हे मराठवाडा, विदर्भ आणि लागतच्या परिसरात जास्त आहे. यामुळे विदर्भात पुढील ४८ तासांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवमान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु हवेतील आद्रतेमुळे हवामानात फारसा बदल होणार नाही.
विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवस हा पाऊस कायम राहणार असल्याने पारा आणखी घसरु शकतो. राज्यामध्ये थंडी ही कायम राहणार आहे. कोकण-गोवा यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यामध्ये पुढील पाच-सहा दिवस हवामान कोरडे राहू शकते. मात्र थंडीचा प्रभाव वाढू शकतो.
पुण्यात आकाश मुख्याता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास आकाश वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर पुढील ७२ तास सकाळी धुक्याचे प्रमाण जास्त राहणार असल्याने दृश्यमानतेत घट होणार आहे. आज सकाळी शिवाजीनगर येथे ११ डिग्री सेल्सिअस एवढे कमी तापमान नोंदवले गेले. तर एनडीए, पाषाण परिसरात देखील सर्वाधिक कमी तापमान नोंदवल्या गेले.
मुंबईत देखील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईत कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे वाढत्या दमट वातावरणापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव जिल्ह्यात गारठा वाढला आहे. नाशिकच्या निफाड येथे तापमानात मोठी घट झाली आहे. येथील नागरिक थंडीमुळे बेजार झाले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या