Maharashtra IMD Weather Update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानात मोठा बदल झाला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या सकाळी व रात्री गारवा जाणवत असला तरी त्यात घट झाली आहे. १० नंतर ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ होत आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात हवामानात मोठे बदल होणार आहे. तापमानात मोठ वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा राज्यातील तापमानावर परिणाम होत आहे. यामुळे राज्यातील तापमानात मोठे बदल होत आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग व विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळांना सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात कमाल व किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. सकाळी १० नंतर रखरखीत ऊन पडत असल्याने जिवाची लाही लाही होत आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस हे तापमान कायम राहणार आहे. राज्यात हवामानात कोरडे राहणार असून पहाटे गारवा व दुपारी उन्ह अशी अवस्था कायम राहणार आहे. मराठवाड्यात व विदर्भात देखील हीच स्थिती राहणार आहे. येथे देखील किमान व कमाल तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या काही दिवसांत थंडी जाणवणार आहे.
हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान राहील. तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका पिकांवर होण्याची शक्यता आहे. राज्यात वायव्य दिशेने १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत असून याचा देखील हवामानावर परिणाम होत आहे.
संबंधित बातम्या