मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update : मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 03, 2024 07:18 PM IST

Maharashtra Weather Update : आज सकाळपासून मुंबई, डोंबिवलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. दुपारपासून पावसास सुरूवात झाली. हवामान विभागाने पुढील ३ दिवस मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी (संग्रहित छायाचित्र)
मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी (संग्रहित छायाचित्र)

Maharashtra weather update  : मान्सून केरळात दाखल होऊन तामिळनाडू, कर्नाटकपर्यंत सक्रीय झाला तरी राज्यातील उष्णतेची लाट कमी झालेली नाही. आज सकाळपासून मुंबई, डोंबिवली, पनवेल व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यातच आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार  मान्सून पूर्व पावसाच्या सरी (Pre-Monsoon) कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

आज मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मान्सून पूर्व पावसाने आज डोंबिवली, कल्याण, पनवेल परिसरात  हजेरी लावली. येथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारपासून मुंबई, कोकण, विदर्भात रिमझिम पाऊस पडला.

कोकणातील राजगड, अलिबागमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मान्सून ७ जूनच्या आधी दाखल होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार मान्सून पूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  कुडाळ, सावंतवाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. हवामान विभागाने सिंधुदर्गात दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ येथे रविवारी रात्रीपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून खरीपाच्या पेरण्याही वेळेवर होण्याची शक्यता आहे. 

राज्यात 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता -

महाराष्ट्र राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात सिंधुदुर्ग वगळता उर्वरित जिल्ह्यात पुढील एक ते दोन दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत ४ ते ६ जूनला सिंधुदुर्गमध्ये ३ ते ६ जून पर्यंत मेघगर्जना विजांचा कडकडाट तर ताशी ४० ते ५० किलोमीटरच्या वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

ठाण्यात ४ ते ६ जूनपर्यंत रायगडमध्ये ३ ते ५ जूनपर्यंत रत्नागिरीमध्ये ३ जूनला व सिंधुदुर्गमध्ये दोन जूनला मोजक्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४