Maharashtra IMD Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. तर कमाल तापमान देखील वाढले आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. तर काही ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी गारठा व दुपारी ऊन अशी स्थिती आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पाच पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहणार असून याच परिणाम देखील हवामानावर होणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. तर काही ठिकाणी पावसाचा देखील अलर्ट आहे. पश्चिम हिमालयात पाऊस व बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मैदानी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे राज्यात पुढील पाच दिवसात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
पुण्यात सकाळी आणि रात्री कमालीचा गारठा पडत आहे. तर दुपारी मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे. सकाळी धुके देखील पडत आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाली. किमान तापमान हे १६ ते १७ अंशांवर गेले होते. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असून घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवसात तापमानात आणखी वाढ होणार आहे. राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहणार असल्याने याच परिमाण हवामानावर होणार आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार आहे. राज्यात थंडी कमी झऑई आहे. तर किमान तापमानात अनेक चढ उतार होत आहेत. तर काही ठिकाणी धुके देखील पडत आहे .
संबंधित बातम्या