Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत राज्य तापणार! वाढत्या उन्हापासून काळजी घ्या, IMDने काय दिला इशारा, वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत राज्य तापणार! वाढत्या उन्हापासून काळजी घ्या, IMDने काय दिला इशारा, वाचा

Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत राज्य तापणार! वाढत्या उन्हापासून काळजी घ्या, IMDने काय दिला इशारा, वाचा

Feb 04, 2025 08:02 AM IST

Maharashtra Weather Update: राज्यात तापमान वाढत आहे. या तापमानामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फेब्रुवारीत राज्य तापणार! वाढत्या उन्हापासून काळजी घ्या, IMDने काय दिला इशारा, वाचा
फेब्रुवारीत राज्य तापणार! वाढत्या उन्हापासून काळजी घ्या, IMDने काय दिला इशारा, वाचा

Maharashtra Weather News : राज्यासह देशाच्या उत्रेकडील राज्यांमध्ये पर्वतीय क्षेत्र वगळता मैदानी भागांमध्येही देखील आता तापमान वाढू लागले आहे. कमाल तापमानावाढ वाढ होत असल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चालून लागण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह दक्षिण व मध्य भारतातही तापमानवाढ होत असून हवामान विभागाच्या माहितीनुसार जानेवारीप्रमाणे राज्यात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाड्यात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' अर्थात पश्चिमी झंझावाताचा परिणाम कमी झाल्याने मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पहाटे पडणारी थंडीसुद्धा गायब होणार आहे. तर उन्हाच्या झळा वाढणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात कमाल व किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहणार आहे. पुणे, मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात तापमान वाढणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात चार ते पाच दिवस तीव्र थंडी राहण्याची शक्यता आहे. सध्या प्रशांत महासागरात ला नीना स्थिती सक्रीय आहे. तर मध्य व पूर्व भागात तापमान सामान्य तापमानाच्या खाली आहे. एप्रिलच्या शेवटी ला नीना सक्रीय होण्याची शक्यता आहे. 

राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. तर पुढील २४ तासात राज्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा किमान तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढणार आहे. तर उकाडा वाढल्याने नागरिकांचे देखील हाल होणार आहे. सकाळी ९ पासून उन्ह वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात येत्या ३ दिवसात तापमानात वाढ होणार आहे. तर विदर्भात देखील तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कोरडे आणि शुष्क तापमान राहणार असून किमान व कमाल तापमाणात वाढ होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर