Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

Dec 22, 2024 07:28 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठे बदल होणार आहे. थंडी हळूहळू कमी होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट
राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल होणार आहे. थंडीचा जोर ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार असून त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असल्याने इशान्येकडील राज्यांत व विदर्भात पुढील दोन पावसाची शक्यता आहे. विदर्भात २४ व २५ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगाल उपसागरावर असलेले ठळक कमी दाग कमी दाबाचे क्षेत्र काल संध्याकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले आहे. हे डिप्रेशन आज सकाळी पश्चिम मध्ये बंगालच्या उपसागरावर असून पुढील बारा तासात ते पूर्व ईशान्य दिशेने सरकण्याची हळूहळू सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर समुद्रावरच त्याची तीव्रता टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुढील तीन दिवस चारही उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवसात म्हणजेच तारीख २४ व २५ डिसेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व उर्वरित कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या २४ तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. परंतु त्यानंतरच्या पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू दोन ते चार डिग्री चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि आसपासच्या परिसरात आज २२ व २३ डिसेंबरला आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

थंडी ओसरली

राज्यात गेल्या आठडव्यात कडक्याची थंडी पडली होती. या थंडीमुळे नागरिक हैराण झाले होते. तापमान एका अंकावर आले होते. मात्र, आता थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मराठवाड्यात बहुतांश भागात गारठा कायम आहे तर किमान तापमानात वाढ देखील झाली आहे.

उत्तरेत थंडीचा कडाका कायम

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर कायम आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये कमालीची थंडी आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर