पुणे : वायव्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ७, ८, ९ तारखेला राज्यात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. ९ तारखेपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात ६ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी मारठवड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगली, बीड या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यात ७, ८ आणि ९ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ६ आणि ७ तारखेला तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज पासून ८ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात ५, ७ आणि ८ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ६ तारखेला वीजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून यामुले या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर इतर दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात आज वातावरण सामान्यत: ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. ७ आणि ८ तारखेला आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच पावसाच्या काही तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. ९, १०, ११ तारखेला आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. ६,७, ८ तारखेला घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या